
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
थँलेसेमिया बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था चंद्रपुर (एफ.13988 च.) च्या वतीने दि. ८ मे २०२३ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/सामान्य रूग्णालय चंद्रपुर थँलेसेमिया डे केयर वॉर्ड न.16 चे बाजूच्या दालनातील सेंटर येथे असलेल्या रुग्णांना जागतीक थँलेसेमिया दिवसानिमीत्त मिष्ठान्न व फळ वाटप करून ‘जागतिक थॅंलेसेमिया दिवस’ साजरा करण्यात आला आहे.
याप्रसंगी एच.ओ.डी विभाग प्रमुख, डॉक्टर, सिस्टर्स आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता
संस्थाध्यक्ष – सुरेश आत्राम , उपाध्यक्ष – डॉ.सुधाकर मडावी , सचिव – श्रेया श्रीकांत खोंड , सहसचिव श्री.विनोद भकते , कोषाध्यक्ष – सौ.छाया आत्राम यांचेसह सदस्य सर्वश्री देविदास सारवे , घनश्याम धाबेकर , श्री. उलमाले , ओंकार आत्राम , सोनुने व सर्व पेशंटचे पालक व नातेवाईकांची
उपस्थित होती.