
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्र राज्यात मागील पंधरा दिवसापासून अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी विज पडून कुठे जनावरे दगावली तर कुठे मानसे दगावली अशातच काही ठिकाणी विद्यूत पुरवठा करणारी पोल तुटून पडल्यामुळे त्याला स्पर्श होऊन मानसे दगावली असून या प्रकरणाची दखल घेऊन या गोरगरिबांचा संकटमोचन कोणीच बनू शकले नाहीत अशी खंत या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
सद्याची परिस्थितीराज्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे केळीचे पीक असो, आंबा, चिंच, ज्वारी, कांदा, भुईमुगाच्या शेंगा असो की, भाजीपाला असो अशा पिकांचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना याचा गांभीर्याने दखलनिवडणूका असो की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका असो यातच सर्वच पक्षाचे नेते व्यस्त होते परंतू आपला शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याचे बोलले जाते मात्र त्याच्याशेतात नुकसान झालेल्या पिकाचा मोबदला न देता नुसत्या आश्र्वासनाची खैरात केली जाते, शेतकरी मात्र डोळ्यात तेल ओतून झालेल्या नुकसानीचा मोबदला कधी मिळणार याकडे वाट बघत बसावे लागत आहेअसेही चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.माञ
कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे नेते कर्नाटकाच्या निवडणूकीमध्ये प्रचारादरम्यान व्यस्त असून सद्या आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. परंतू आपल्याला निवडून दिलेल्या मतदार राजाच्या अडचणीला सामोरे न जाता, त्यांच्या अडचणीची विचारपूस न करता केवळ औपचारिक घोषणा करण्यात आली असल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.