
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पैठण -गजानान ठोके
पावसाळा जवळ आल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी आता खरीपाच्या नवीन हंगामासाठी शेती तयार करण्यात व्यस्त असून मशागतीच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे
पैठण तालुक्यातील शेतकरी खरिप हंगामात प्रामुख्याने कापूस तूर सोयाबीन मका बाजरी ई पिके घेतात मागील हंगामातील पिकांचे अवशेष ट्रक्टरच्या साहाय्याने नष्ट करून जमिनीची नांगरणी करून करून खरीपाच्या हंगामातील पेरणीसाठी शेत तयार केले जात आहे
जमीनीच्या मशागतीच्या कामासाठी ट्रक्टरचा उपयोग होत असल्याने ट्रक्टर व्यवसायीकांना काम मिळत आहे सध्या जमीन नांगरणी साठी 1500ते 1700तर रोटर मारण्यासाठी 1300ते1500 प्रती एकर शेतकर्यांना कडून घेतले जात आहे
यंदा मृग नक्षत्रात पेरणी होईल या आशेने शेतकरी बांधव शेतीच्या कामात गुंतलेले तालुक्यातील गावोगावी दिसून येत आहे