
दैनिक चालु वार्ता देवणी ता. प्रतिनिधी- नयूम खाजामिय्या शेख
==========================
लातूर/देवणी:- देवणी तालुक्यातील धनेगाव अमराई शिवारातील एक विहीरीत एक अनोळखी तरुणांचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले.
माहिती अशी की, धनेगाव शिवारातील (आमराई) सुभाष बोरोळे यांच्या शेतातील विहीरीत सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रेत तरंगत असल्याचे आढळूले याबाबत देवणी ठाण्यांच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शेतकऱ्यांचा मदतीने प्रेत बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी येथे दाखल करण्यात आले .ही माहिती देशमुख पोलीस यांच्याकडून मिळाली आहे सदर या व्यक्तीचा तपास आणखी लागला नाही या व्यक्तीचा रंग काळा असून तरूण अंदाजे वय वर्षे २५ असुन याबाबत देवणी पोलिस ठाण्यात त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पोकॉ देवीदास किंवडे यांनी सांगितले