
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कर्नाटक राज्य विधानसभेचे स्टार प्रचारक अशोकर चव्हाण यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मीनल पाटील खतगावकर यांच्या एकंबा येथील माहेरा सदिच्छा भेट दिली.
त्यांच्यासमवेत माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आमदार जितेश भैया आंतापुरकर यांनीही भेट दिली. यावेळी अरुण पाटील एकंबेकर, प्रकाश पाटील एकंबेकर, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, संदीप पाटील यांच्यासह संपूर्ण एकंबेकर परिवार उपस्थित होता. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकंबे परिवारला सदिच्छा भेट दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.