
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड :- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या नांदेड जिल्हा कोषाध्यक्षपदी ग्रामसेवक शिवराज तांबोळी यांची आज सर्वांनुमते निवड करण्यात आली . महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा नांदेडची त्रैमासिक सभा दि.८ मे २०२३ रोज सोमवार ह्या दिवशी नांदेड येथे पार पडली.या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे पाटील , सचिव हनुमंत वाडेकर, कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, मावळते कोषाध्यक्ष धम्मानंद धोत्रे, यांच्या मार्गदर्शनात ही निवड प्रक्रिया पार पडली.
राज्यातील ग्रामसेवकांचे सर्वात मजबूत आणि सक्षम संघटन म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेकडे पाहिले जाते. ग्रामसेवकांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी, ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहिलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने असंख्य यशस्वी आंदोलने पार पडली आहेत. संघटनेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेड येथे त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून शिवराज तांबोळी यांची निवड करण्यात आली तर याच त्रैमासिक सभेत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे कनिष्ठ सहायक मंगेश ढेंबरे यांचा चार्ज काढावा , पाच वर्षाचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार त्वरित वितरित करणे, किनवट तालुक्यातील पेसा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या निकालानुसार एक स्तर वेतन श्रेणी लागू करणे, सेवा ज्येष्ठता यादी दुरुस्त करणे आदी ठरावही परित करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक टी. जी. रातोळीकर, सुर्यकांत बोंडले, सुदर्शन कपाळे, गजानन शिंदे, संजय रामोड, जे.एन. वनसागरे , रणजित हटकर, शिवाजी कदम, बोरगुलवार , कळणे पाटील, आलेवाड शंकर, बालाजी इंगळे, माधव शिंदे, सुनील हाळदेवाड , आनंद कंधारे, राजेंद्र भोगे, खिल्लारे, प्रेमचंद्र गुट्टे, व्ही.एन जाधव, डी एस पवार, मांजरमकर , बी डी पांचाळ, नामदेव सोनकांबळे , नागेश येरसनवार, रविराज नव्हारे, अशोक कदम , यादव सूर्यवंशी, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. शिवराज तांबोळी यांची कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सुरेश मामा बास्टे भाजपा ता.उपाध्यक्ष तथा तेलंगवाडीचे माजी सरपंच ,आनंदराव पाटील शिंदे (प.स.लोहा सभापती) ,शंकरराव ढगे ( प.स.लोहा माजी सभापती ),तु.श.वारकड गुरूजी ,संजय पाटील मोरे ( चेअरमन जोशीसांगवी ),रूद्र ( संजय) वारकड – चेअरमन उस्माननगर, नातेवाईक, तेलंगवाडी येथील गावकरी,मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.