
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
तहसीलदार गणेश चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे व स्थागुशा ने घेतली भेट.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : इस्रोमध्ये कार्यरत भारतीय तथा वरिष्ठ वैज्ञानिक पंकज प्रकाश कदम यांच्यावर परभणी शहरापासून अवघ्या काही कि.मी.अंतरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. नांदेडहून परभणीकडे येताना यासाठी येथील पूर्णा नदीच्या पूलावर हा हल्ला झाला आहे. शरीरावर हत्यारांचा गंभीर मार बसल्यामुळे जखमी पंकज प्रकाश कदम यांच्यावर परभणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची खबर लागताच परभणीचे तहसीलदार गणेश चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ भेट देऊन चौकशी केली आहे.
इस्रोमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक पदावर कार्यरत पंकज प्रकाश कदम हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील व उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील रहिवासी आहेत. त्यांचे परभणी शहरातील शिवराम नगरात वास्तव्यास असलेले मुंजाजीराव शेंगुळे यांच्या मुलीसोबत विवाह करण्याचे निश्चित झाले होते. मंगळवार, दि.०९ में २०२३ रोजी परभणीतील शरद गार्डन या मंगल कार्यालयात त्यांचा विवाह होणार असल्यामुळे ते ०८ में रोजीच दुपारी ४.३० च्या सुमारास आपल्या परिवारासह एका वाहनाने हळदीसाठी परभणीकडे येत होते. त्यांचे वाहन परभणी शहरापासून कांही कि.मी.अंतरावरील राहाटी येथील पूर्णा नदीच्या पूलावर येताच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी पंकज यांच्यावर जबरी हल्ला चढविला. तीन दुचाकीवर आलेल्या एकूण सहा जणांनी नवरदेव पंकज यांचे वाहन थांबविले. काही कळण्याच्या आतच त्या हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने जबरी मारहाण केली. त्यात पंकज हे गंभीर जखमी झाले. मदतीसाठी येणाऱ्यांनाही हल्लेखोरांनी दमबाजी केली, धमकी दिल्याचे समजते. हल्ला करुन हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
जखमी पंकज कदम यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे हात, पाय व पाठीवर गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याची खबर कळताच परभणीचे तहसीलदार गणेश चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.
दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वीच नांदेड रेल्वे स्थानकाजवळ पंकज यांच्यावर असाच हल्ला करण्यात आला होता. त्यानंतरचा दुसरा हल्ला म्हणजे स्वतःच्या लग्नासाठी परभणीला येताना राहाटी पुलावर झालेला. एका पाठोपाठ एक असा दुहेरी हल्ला एकाच व्यक्तीवर झाल्याने या हल्ल्यातील मुख्य टार्गेट म्हणजे पंकज प्रकाश कदम हेच होते, असेच यावरून दिसून येत आहे. तथापि हे दोन्ही हल्ले पंकज यांच्यावर नेमके कोणत्या कारणातून झाले असावेत, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ज्यांनी सारखे दोन हल्ले केले, त्यांच्या परिवारातील मुलींबरोबर लग्न करण्याचे वचन पंकज किंवा त्यांच्या परिवाराने दिले असावे का, किंवा पंकज कदम आणि हल्लेखोरांची अन्य कोणत्या कारणावरुन पूर्वीची काही दुष्मनी होती का, किंवा अन्य काही मजबूत कारण असू शकते का, ज्यामुळे लागोपाठ दुसऱ्यांदा हल्ला करुन पंकजला गंभीर जखमी करायचे ठरले असावे, यापैकी निश्चितच कोणते तरी गंभीर कारण असू शकेल, ज्यामुळे त्यांनी केवळ गंभीर हल्ला केला आहे. त्यांना पंकजला जीवानिशी ठार मारायचेच नव्हते, फक्त अद्दल घडविली जावी म्हणून हलक्याशा नेले असावे. हेच यातून निष्पन्न झाल्याचे दिसून येत आहे. ते ओळखीचे व जुन्या एखाद्या गंभीर प्रकरणाशी लिप्त असेच इसम असू शकतात, ज्यामुळे त्यांनी बरोबर राहाटीचाच पूल गाठला व इक्षिप्त डाव साधला. लवकरच यातील सत्य काय ते पुढे येऊ शकेल, परंतु इस्रोसारख्या देशात कर्तव्य बजावणाऱ्या एखाद्या वैज्ञानिकावर भारतात, महाराष्ट्रात नव्हे परभणीत हल्ला करणे म्हणजे अशोभनीय असेच म्हणावे लागेल एवढे मात्र खरे. एकूणच काय तर या हल्ल्यामध्ये हळद जरी रुसली असली तरी कुंकू मात्र नक्कीच हसले आहे, हेच यातून सिद्ध झाले आहे.