
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-शेख इसाक
लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘भारत गौरव पुरस्कार’ यंदा आ. मेघना साकोरे – बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. ब्रिटनच्या संसदेत एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार आ. मेघना बोर्डीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडणार आहे.
विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो. आ. मेघना साकोरे – बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे देशाच्या सामाजिक आणि भौतिक विकासात त्यांनी भर घातल्याचे कळवत आयोजकांनी त्यांना ब्रिटिश संसदेत होणाऱ्या या पुरस्काराच्या वितरणासाठी सन्मानपूर्वक आमंत्रण दिले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात वेदांता ग्रुपचे सीएमडी डॉ. नरेश त्रेहान, जेट एअरवेजचे अंकित जालान, जिनिव्हा येथील शास्त्रज्ञ सीईआरएन अर्चना शर्मा, पोलंड येथील अमित लाथ यांच्यासह जपान, उझबेकिस्तान, भारत, यूएसए, युके, युरोप, न्यूझीलंड, फ्रान्ससह जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण करण्यात येणार आहे.
मागील दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. याआधी ‘भारत गौरव पुरस्कार’ आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, चित्रपट कलाकार मनोज कुमार, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी, जगातील सर्वात प्रभावशाली महिला श्रीमती इंदिरा नूयी, जैन संत पुलक सागर, आचार्य लोकेश मुनी, गुगलचे सीईओ संजय गुप्ता, दिवंगत मेजर ध्यानचंद, जीमेलचे शिवा अय्यादुराई, स्व. निरजा भानोत, प्रेरक वक्ते गौर गोपालदास, सीमा तापडिया यांना देण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कारकर्त्यांच्या यादीत आ. मेघना बोर्डिकर यांचे नाव असल्याने जिल्हाभरात कौतुक होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे नाव ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे, असेच म्हणावे लागेल.
मॅम आपले ‘चालू वार्ता’ या मराठी दैनिकाच्या वतीने हार्दिक अभिनंदन !
“””””””””””“””””””””””””””””””””””””””””””
विविध क्षेत्रात आपण केलेल्या कार्याची दखल घेऊन ब्रिटीश संसदेत आपला यथोचित सन्मान करण्याचे योजिले आहे. याचा सार्थ अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. तद्वतच ‘चालु वार्ता ‘या मराठी दैनिकातर्फे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !
कार्यतत्पर आमदार म्हणून ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नाव रोशन केले, त्याच बोर्डीकर साहेबांचा राजकीय वारसा आपण अगदी नेटाने चालविला आहे. मागील काळात जी काही धडाडीची कामे आपण मार्गी लावली आहेत, त्याची किंमत राज्यात सर्वाधिकपणे होणे अपेक्षित होते, तथापि ‘अच्छे कर्मों को देर है, लेकीन अंधेर नहीं’, या कथनी प्रमाणे थेट साता समुद्रापार आपल्या कार्याची दखल घेतली गेली. या माध्यमातून आपल्या कार्याचा व परभणीचाही डंका ब्रिटिश देशात वाजला गेला, ही खरोखरच अत्यंत अभिमानाची बाब म्हणावी लागेल. आपल्या कार्याची महती व निश्वार्थी सेवेची दखल थेट सातासमुद्रापार घेतली गेली, हे अहोभाग्य तुमचे, तुमच्या दोन्ही परिवारांचे तर आहेच त्याशिवाय समस्त परभणीकर व अवघ्या महाराष्ट्राचे सुध्दा आहे. कोणा एके काळी बॉलिवूड द्वारा प्रचलित असलेली ‘जगात जर्मनी व भारतात परभणी’ ही प्रणाली एक विरंगुळा म्हणून संबोधली जायची परंतु आता प्रत्यक्षात आपल्या नानाविध कार्याची दखल थेट ब्रिटिशमधील भारतीय जनतेने विशेषत्वाने घेतली आहे. त्या प्रित्यर्थ ब्रिटिश संसदेमध्येच आपणास नवाजा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या निजामकालीन परभणी जिल्ह्याचा नागरी व सर्वांगीण विकास येत्या काळात निश्चितच भरभरुन होऊ शकेल, असे तुमच्या या गौरवशाली कर्तृत्वामुळे दिसून येत आहे, असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.
दत्तात्रय वामनराव कराळे
उपसंपादक तथा जिल्हा प्रतिनिधी,
दैनिक चालु वार्ता,
परभणी.
९८६०११७५९२