
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ध्यान शिबिर सोमवार दि. ८ मे रोजी राणी हिराई सभागृहात सायंकाळी ५ वाजता घेण्यात आले.
योग आणि ध्यान अनेक वर्षांपासुन भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे मात्र काही काळापासुन आधुनिकतेच्या नावावर आपण आपल्या आरोग्याविषयी इतके बेजजाबदार झालो राहतो की समाजाचा मोठा भाग हा मानसिक तणावग्रस्त आहे. सांस्कृतीक मंत्रालयाने या दिशेनं एक सकारात्मक पाऊल ” हर घर ध्यान ” अभियानद्वारे उचलले आहे.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन ” हर घर ध्यान ” अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जात असुन त्याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत ध्यान शिबीर घेण्यात आले.
महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. वेगवान जीवनात, अनेक घटक उच्च-ताणाच्या पातळीत योगदान देतात. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ध्यान हा जुना सराव आहे जो तणाव पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. १० मिनिटांच्या ध्यान सत्राने तुम्ही तुमचा ताण कसा कमी करू शकता याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.
सौ.मुग्धा खांडे, सौ.योगिता वानखेडे,श्री.रवींद्र लाखे, सौ.वृंदा लाखे, सौ.प्रीती संघवी, सौ.स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमुने उपस्थित मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.
आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम तसेच योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील, उपायुक्त श्री.अशोक गराटे,शहर अभियंता श्री.महेश बारई, मुख्य लेखाधिकारी श्री.मनोहर बागडे, सहायक संचालक नगररचना श्री.सुनील दहीकर,उपअभियंता श्री.विजय बोरीकर, श्री.अनिल घुमडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते