
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंदशेखर बावनकुळे यांचा अहमदपूर शहरात मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे हे लातूर येथे संघटनात्मक मेळाव्यासाठी नांदेड हून अहमदपूर मार्गे लातूर जात असताना अहमदपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आमदार चंदशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांचे अहमदपूर शहरात आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करून ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन चंदशेखर बावनकुळे यांचे क्रेन च्या साह्याने भला मोठा पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष अॅड.भारत चामे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवणकुमार मद्देवाड, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, अॅड. अमित रेड्डी, माजी उपसभापती निळकंठ पाटील,चेअरमण शंकर अप्पा भालके, भाजपचे तालुका अध्यक्ष हणमंत देवकते,रामभाऊ बेल्लाळे, नगरसेवक राहुल शिवपुजे, पंचायत समितीचे सदस्य रामभाऊ नरवटे,अॅड.किशोर कोरे,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी,माजी उपसभापती राजकुमार खंदाडे, सुधीर गोरटे,विलास पाटील,माणिक नरवटे,बबलूखान पठाण, निखिल कासनाळे, प्रताप पाटील,गणेश हालसे,संगम कुमदळे ,यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.