
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड, तालुक्यातील बोमनाळी येथे भजन व कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा वारकरी साहित्य परिषद नांदेड जिल्हा यांच्यावतीने वैकुंठवासी ह.भ.प विठ्ठल महाराज बोमनाळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणास दिनांक 25 मे 2023 रोजी बोमनाळी येथे भव्य दिव्य जिल्हास्तरीय कीर्तन व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या वारकरी साहित्य परिषद नांदेड जिल्ह्याच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे वारकरी परिषदेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ह.भ. प. राजेश्वर महाराज बोमनाळीकर यांनी कळविले आहे. या वारकरी साहित्य परिषदेच्या भजन व किर्तन स्पर्धेच्या कार्यक्रमाला
वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. गुरुवर्य काकाजी पाटील हे बोमनाळी येथे येणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी व वारकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व काकाजी पाटील यांच्यासमोर आपल्या वारकऱ्यांची एकता दाखवून द्यावी असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक ह.भ. प राजेश्वर महाराज बोमनाळीकर यांनी केले आहे.