
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे …
मुखेड सा.वा मुखेड तालुक्यातील बेरळी बुद्रुक येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित महिला नागरिक स्वातंत्र सैनिक श्रीमती रेजाबाई हनुमंतराव पाटील वडजे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सभापती अँड. खुशालराव पाटील उमरदरिकर, आरपीआय जिल्हा अध्यक्ष गौतम काळे,चेअरमन व्यंकटराव लोहबंदे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बोनलेवाड यांनी बेरळी येथे वडजे पाटील यांच्या घरी भेट देवून शिवाजीराव पाटील, भागवत पाटील, उपसरपंच गणेश पाटील बेळीकर, पंडीत पाटील यांचे सांत्वन केले व वडजे कुटुंबाला धीर दिला.