
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शिवसेना नेते तथा दैनिक सामना चे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर असताना दि. १९ मे रोजी लोहा येथे आले.लोहयात शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या बिडवई नगर येथील कैलास स्मृती निवासस्थानी भेट दिली.शिवसेना नेते खा.संजय राऊत यांचे आगमना प्रसंगी दोन जेसीबी च्या साहाय्याने पुष्पवृष्टीने भव्यदिव्य जंगी स्वागत करण्यात आले. लातूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण व माजी नगराध्यक्षा सौ. आशाताई रोहिदास चव्हाण यांच्या वतीने लोह्याच्या परंपरे नुसार शाल पुष्पहार व भव्य दिव्य मोठा वजनाचा खारीक खोबऱ्याचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
राज्यातील शिवसेनेचे महत्वपूर्ण नेते जेष्ठ पत्रकार तथा दैनिक सामनाचे संपादक खा. संजय राऊत हे व्यक्तिमत्त्व विचाराने अतिशय रोखठोक लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.खा.संजय राऊत यांच्या सोबत माजी खासदार सुभाष वानखेडे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख विनोद पावडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,खरेदी विक्री संघाचे संचालक भिमराव पाटील शिंदे,शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण,शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संभाजी पवार, पतपेढीचे माजी चेअरमन बी.वाय.चव्हाण,माजी नगर सेवक दत्ता कांबळे,रामकिशन पारेकर,अशोक केंद्रे कैलास कहाळेकर,लोहा सेवा सोसायटीचे चेअरमन गोविंद चव्हाण,बालाजी पाटील,मोहन वाघमारे शिवसैनिक,युवासेनेचे ,शिक्षकसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.