
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -प्रवीण मुंडे
अमरावती (धारणी) : सुसरदा वनपरिक्षेत्राच्या डाबका नियत क्षेत्रामध्ये कार्यरत कु.मनीषा रामू घुमारे यांनी २०२२-२३ मेळघाट प्रादेशिक वनविभागात वनसंवर्धन व वनरक्षणार्थ दिलेल्या योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नियत क्षेत्राच्या अतिरिक्त आणि नियत क्षेत्रालगत मध्यप्रदेशाच्या सीमेलगत कु.मनीषा रामू घुमारे यांनी या क्षेत्रामध्ये नियमीत दिवस-रात्रीची गस्त करून अवैद्य वृक्षतोडीवर आळा घालण्याचे काम त्यांनी केले आहे.तसेच खडतर डोंगराळ भागातून गस्त करताना वनवा हंगामात स्वतः आग विझवण्याचे त्यांनी काम केले.तर उन्हाळ्यातील वणव्यावर नियंत्रण मिळवण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे.तसेच शासकीय कामावर कार्यरत असताना त्यांचा बाळ दोन वर्षाचा होईपर्यंत छोट्याशा बाळाचा सांभाळ करत आपली शासकीय कामगिरी बजावली आणि अवैद्य वृक्षतोडीवर आळा घालण्याचे काम केले.शिवाय पावसाळी कामासमवेत रोप वनामध्ये रोप लागवडीनंतरचे सर्व कार्य करून रोपांना जास्तीत-जास्त वाढ मिळेल या दृष्टीने त्यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात आले आणि त्याचा योग्य परिणाम रोपांची चांगल्याप्रकारे पालन पोषण करून वाढ होण्यास मदत झाली.ह्या संपूर्ण त्यांच्या कौशल्याच्या आणि शौर्याच्या कामाची दखल घेत मा.उपवनसंरक्षक मेळघाट वनविभाग परतवाडा यांनी रोप वनाला भेट देऊन त्यांनी कुमारी मनीषा रामू घुमारे यांची मेळघाट वनविभागात वनसंरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कौतुक केले आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.सदर योगदान मनीषा यांनी आपले पती गोलू मुंडे यांना दिले.