
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती :-प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अमरावती देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
तर गेल्या २० वर्षापासून आमदार बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत.अखेर आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला.दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.शासनाने परिपत्रक काढून त्यांना हा दर्जा जाहीर केला आहे.
यात राज्यस्तरीय सदस्यांची समिती गठीत करण्यात आली असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव,आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे,उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महानगरपालिका आयुक्त,जिल्हा पोलीस प्रमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद,जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा समाज कल्याण अधिकारी अशी जिल्ह्याची समिती असेल.