दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी -किशोर फड
बीड/अंबाजोगाई
पतीच्या पश्चात मुलगी जयश्रीच्या शिक्षणानंतर तिच्या आईला आपल्या लेकीच्या लग्नाची चिंता होती. मात्र आधार माणुसकीचा व आदर्श मैत्री फाउंडेशन ग्रुपने त्या मातेची ही चिंता दूर केली. रविवारी (दि.२१) जयश्रीचे तिच्या गावात मंगईवाडी येथे वाजत, गाजत उत्साहात हे लग्न, येल्डा (ता. अंबाजोगाई) येथील सोन्नर परिवारातील स्वप्नील समवेत झाले.
पतीच्या पश्चातही महिला खंबीरपणे संसाराचा गाडा कसा चालवितात हे जयश्रीची आई संजीवनी शिंदे यांनी सिध्द केले. दोन मुले, दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. पती हयात असतानाच मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. पती रामदास यांच्या निधनानंतर मुलांच्या शिक्षणाची चिंता या माय माऊलीला होती. पुढे काही दिवसात हा शिंदे परिवार आधार माणुसकीचा परिवाराशी जोडला गेल्याने जयश्रीचे बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर ती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पॅरामेडिकल पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. तिचा भाऊ राहुलनेही बारावीची निटची परीक्षा दिली आहे. तर मोठा भाऊ ऊसतोडीला जातो.
जयश्रीचे लग्न करून एका जबाबदारीतून आपण मुक्त व्हावे, असे तिची आई संजीवनी यांना वाटले. त्यानुसार त्यांनी येल्डा येथील रामचंद्र सोन्नर यांचा मुलगा स्वप्निल याच्याशी विवाह जमविला. मात्र हे लग्न जमविल्यानंतर ते कसे पार पाडायचे याची त्यांना चिंता होती. त्यामुळे त्यांनी याची माहिती आधार माणुसकीचा उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांना दिली. त्यानंतर लातूरच्या मैत्री फाउंडेशन ग्रुपनेही या लग्नासाठी पुढाकार घेत वधू, वरांसाठी काही महत्वाच्या वस्तूही घेऊन दिल्या. तर आधार माणुसकीचा उपक्रमाने अन्नदान व नियोजनाची जबाबदारी घेतली, चनई येथील सावरे मंडप डेकचरेटर्सने फक्त मजुरी घेऊन मंडपासह ध्वनीक्षपनाची सोय करून दिली. असे अनेकांचे हात या लग्नास लागले. डाॅ. गुरव, गोविंदराव देशमुख, ज्ञानेश्वर नांदवटे, विनायक पवार, निवृत्त मुख्याध्यापक सुधाकर शिंदे यांनीही हातभार लावला. मुलीच्या मामानेही कन्यादान केले. त्यामुळे मदतीचा आधार घेत हा सोहळा वाजत, गाजत व उत्साहात पार पडला.
मंगईवाडी या डोंगरी भागात झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी मैत्री फाउंडेशनचे अभिजित देशमुख, संतोष बिराजदार, शशिकांत पाटील, सोनू डागवाले, राजेश मित्तल, प्रमोद भोयरेकर, संभाजी नवघरे, संपत जगदाळे, लक्ष्मण चव्हाण, श्रीकृष्ण (पप्पू) बाहेती, राधाकिसन यादव, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह आधार माणुसकीचा परिवारातील श्री. बंडू जांभळे, राहुल सुरवसे, रविंद्र लोमटे ,संजय सुरवसे, नागेश औताडे, राहुल सुरवसे, श्रेयस पवार , सौ सुलक्षणा पवार, सौ वंदना सुरवसे आदींनी या शुभविवाहास हजेरी लावून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. दयानंद शिंदे, विकास शिंदे, सचिन शिंदे, श्री. रामनाथ हिंगे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.


