दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका कुकुडसाथ
कुकुडसाथ:- आपलाच पेन, आपलीच शाई,आपलीच डायरी,आपल्याच तोंडून स्तुती करून होत नसतो कुणी महान….. इतिहासात उजळायच म्हणजे करावं लागते जिवाचं रान….
असच जिवाचं रान करत महाराष्ट्राच्या नकाशावर गावाची ओळख निर्माण करीत,गावाचा जोज्वळ इतिहास उजळायला निघालेले गाव म्हणजे… “कुकूडसाथ”… कोरपना तालुका सिमेवर असलेले कृषी आधारित गाव. कारवा,धुनकी गावाचा समावेश असलेली गटग्रामपंचायत. गावातील लोकांनी एकतेचे दर्शन घडवीत गावाला विकासाच्या प्रवाहात केंद्र स्थानी आणले. महाराष्ट्र शासनानेही गावातील शाश्वत विकास कामांची दखल घेत, केंद्र सरकार राबवीत असलेल्या ” लाईट हाऊस” योजनेत या गावाचा समावेश केला.केंद्रशासनाच्या योजनेत समावेश झालेली ही राज्यातील पहिली व एकमेव ग्रामपंचायत आहे.राज्यस्तरीय चमूने नुकतीच गावाला भेट देऊन कामाची पाहणी केली.
कर्तबगार गावातील ग्रामस्थांची प्रेरणा घ्यावी यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणारे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णाजी भोयर, अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा कळमना ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर वाढई, मराठा सेवा संघाचे राजुरा तालुका अध्यक्ष दिनेश पारखी, गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव तथा पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पिंगळे यांनी कुकूडसाथ गावाला सदिच्छा भेट दिली.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शंकरजी आत्राम, उपसरपंच गजाननजी आस्वले,माजी सरपंच सौ.वंदना यशवंत चवले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी यशवंत पाटील चवले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रंजित लखमापुरे, महादेव चवले, भाऊराव मुठ्ठलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


