दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
बल्लारपूर:- बुधवार दिनांक:- 24/05/2023 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर चे शहर अध्यक्ष श्री. रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार व भिवराज सोनी, युथ जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपुर शहरातील PWD अतिथीगृहात “परियोजना मेळावा” आयोजित करण्यात आला, शहरातील शिक्षक, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यापारी, वाहन-चालक, अशा प्रत्येक भागातील लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊन सक्रियते ने काम करण्याकरिता या मेळाव्यात शेकडो लोक उपस्थित होते, आम आदमी पार्टी, बल्लारपूर, द्वारे शहरात केलेल्या कामांची यादी या मेळाव्यात सांगता करण्यात आली, संघटना विस्तार आणि बांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, कार्यशैली याविषयी माहिती देऊन कार्यक्रमाची समाप्ति करण्यात आली
यावेळी आम आदमी पार्टी बल्लारपूर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इत्यादी उपस्थित होते.!


