दैनिक चालु वार्ता बल्लारपूर प्रतिनिधी – कमलेश नेवारे
प्रभाग क्र.६ महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर मोठे हनुमान मंदिर जवळ येथे आमदार निधीतून निर्माणाधीन सांस्कृतिक सभागृह करिता ट्यूबवेल बोर मंजुर करून सदर कामाचे विधिवत भुमीपुजन मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात व बल्लारपूर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष मा. श्री हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात माजी नगरसेविका सौ जयश्री मोहुर्ले व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाले.सोबतच सभागृहनिर्माण करिता अडथळा निर्माण करणारी विद्युत लाईन व ट्रांसफार्मर संच याला स्थानांतरित करण्याकरिता लागणारा अतिरिक्त निधी आदरणीय सुधीरभाऊ यांनी तात्काळ मंजूर करून प्रश्न मार्गी लावला. मागील अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांची सभागृह करिता मोठी मागणी होती ज्याचा पाठपुरावा कर्तव्यदक्ष माजी नगरसेविका सौ जयश्री किशोर मोहुर्ले यांनी मा.पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे करून निकाली काढला. निर्मानाधीन सभागृहाकरिता अतिरिक्त लागणारा निधी याचा वाढीव प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तो लवकरात लवकर मंजूर होईल व अत्यंत शोभनीय सभागृह नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर उपलब्ध होईल असं आश्वासन मा.पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी माजी नगरसेविका सौ. जयश्रीताई मोहुर्ले यांच्या माध्यमातून नागरिकांना दिले.व नागरिकांनी मानले ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार सदर कार्यक्रमाचा पुढाकार सामाजिक कार्यकर्ता श्री किशोर मोहुर्ले यांनी घेतला. या कार्यक्रमा प्रसंगी श्री यशवंतरावजी बोंबले, श्री कुर्मदास जी काळे, श्री राकेश बुरडकर,श्री जनार्दन काकडे,सौ कुंजिता सेंगर,सौ रंजीता कोत्तपल्लिवार, श्रीमती सुनीता चौहान,शीतल ठाकूर,सौ सीमा बोंबले,श्री राजेश कोंनप्रत्तीवार,निलेश कटारे व आदी वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.


