दैनिक चालु वार्ता चंद्रपुर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
महाराष्ट्र पुर्व विभागिय महिला पतंजली योग समितीच्या वतीने चंद्रपूर महानगरातील विविध प्रभागात ७० योगा शिबीरांची शृंखला यशस्वीपणे राबविणा-या जवळपास ५० शिक्षिकांना सेवा दिल्याबद्दल, या सर्व योग शिक्षिकांना दि.२४ मे २०२३ ला महानगर पालिका आयुक्त डॉ विपीन पालिवाल यांचे हस्ते मोमेन्टो देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रामुख्याने राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.स्मिता रेभनकर, जिल्हा महामंत्री सौ.अपर्णा चिडे, जिल्हा प्रभारी नसरीन शेख,सौ.स्मिता श्रीगडीवार, सौ.मनिषा गौर यांचेसह अन्य योग शिक्षिकांचा समावेश होता.


