दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी- कृष्णा जाधव
गेवराई /उमापूर उमापूर ही गेवराई तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असून, येथील पांढऱ्या सोन्याला मातीमोल दर कापूस,बाजरी, ज्वारी,गहू, सोयाबीन,
व अनेक धान्य या बाजारपेठेत येतात.पण भाव मात्र व्यापाऱ्याच्या मनावर ठरतो.येथे 15,16 खेड्याचे धान्य येथे विकण्यासाठी आणले जाते.पण शेतकऱ्याला येथे मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजीने घरी परतावे लागते.
कापूस हा येथील प्रमुख पीक असून, आज कापसाला 6,300 भाव आहे.शेतकरी याला करणार काय?असा एक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.शेतीला मशागतीला आणि बी बियाणेला खर्च पाहिला तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीच उरत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
त्यात खतांचे भाव गगनाला भिडले.औषधाचे भाव वाऱ्यासारखे निघाले.आणि मजूर तीनशे रुपये रोज आहे.कापसावरील फवारणी पाचशे रुपये रोज आहे.कापूस वेचणीला वीस रुपये किलो आहे.आणि कापसाला भाव 6300 रु क्विंटल आहे.आणि अशाच शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही.शेवट त्यांच्या पदरात काहीच उरत नाही.स्वतःची मेहनत ही फुकट वाया जाते.आणि व्यापारी याच्यावर मजे मारतात.वादळी वाऱ्यासह पाऊस होते.गारपीट होते.अतोनात भरपूर नुकसान शेतकऱ्यांचे होते.बळीराजा कधी सुखावू शकत नाही का?
व्यापाऱ्यांकडून बळीराजाची पिळवणूक केली जाते.राज्यातील शेतकऱ्यांवर सरकारचे लक्ष नाही का?बळीराजा आणखी किती संकट पेलवणार?असे अनेक प्रश्न बळीराजावर निर्माण झाले आहे.
सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.
गावागावातून शेतकऱ्यांची ही खंत व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी कधीच आपल्या मालाचा योग्य मोबदला मिळाला नाही.आज कांद्याचा एक रुपया 50 पैसे असा भाव ठरतोय.
3000 रुपये क्विंटल ची बाजरी आज दोन हजार रुपये क्विंटल ने घेतली जाते शेतकऱ्यांकडून,
8000 चे सोयाबीन 4000 वर येऊन थांबले आहे.ही बळीराजाची पिळवणूक थांबवली पाहिजे,अशी खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.


