दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
जिल्ह्यातील वरोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथील शेतकऱ्यांकडील जनावरांना लम्पी या रोगाची लागण होऊन जनावरे दगावल्याची माहिती असुन या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात यायला पाहिजे होती. परंतु लसिकरण व उपचार होत नसल्याने शेतकरी मोठ्या विवंचनेत पडलेला आहे.दगावलेल्या जनावरांची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे नसल्याचे वृत्त हाती लागले आहे.अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे जनावरे दगावल्याची भावना मृत जनावरांचे मालक असलेल्या शेतक-यांमध्ये दिसुन येत आहे.त्यामुळे यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन तालुक्यात जनावरांना मध्ये वाढत असलेल्या लम्पी रोगाला त्वरित रोखण्यासाठी शासनाने गांवनिहाय लसीकरण त्वरित सुरू करावे अशी मागणी सरपंच विशाल नानाजी पारखी यांनी चंद्रपूरात पत्रकार परिषदेतून केली आहे.


