दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम :-शहरात दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरत असतो. या आठवडी बाजारात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांनी आपल्या मातोश्री स्मृतीशेष विमल गोरख गायकवाड यांच्या स्मरणार्थ दर गुरुवारी आठवडी बाजार येथे नागरिकांना थंड पाणी पिण्यासाठी पाणपोईची सोय केली आहे. गुरुवारी पाणपोईचे उद्घाटन वकील मंडळाच्या अध्यक्षा ऍड. अमृता ताई गाढवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटनास श्रीमंत धनाजीराव थोरात, तानाजी गाढवे, आसिफ भाई जमादार, सम्यक दादा शिंदे, फारूक बेग मोगल, लहुजी शक्ती सेनेच्या पश्चिम जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई साठे, महेंद्र दादा गायकवाड, सायरन गायकवाड, तालुका उपाध्यक्ष लहू नागटिळक, स्वप्निल जानराव, सुनील बनसोडे, विष्णू जाधव,गुड्डू कुरेशी
या पाणपोईचा आठवडी बाजार ला येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


