दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) नजीकच्या आर्वी
तालुक्यातील मग्रारा रोजगार हमी योजना सण २०२३-२४ अंतर्गत पाऊस पाणी संकलन प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन सरपंच बालाभाऊ नथोपंथ सोनटक्के यांचे हस्ते करण्यात आले , यावेळी आर्वी पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ गणेश माने,शाखा अभियंता राजेंद्र तसरे,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोजगार हमी कु. जयमाला कोहळे, डेटा एन्ट्री ऑपरेटर कु. प्रणाली कसर,पॅनल तांत्रिक अधिकारी नितीन भगत व अमोल झामरे उपस्थित होते.
म ग रा रो हमी योजनेतून छतावरील पावसाच्या पाण्याला खोल जमीनित मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी व भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई निवारण्या करिता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा प) डॉ ज्ञानदा फणसे यांचे संकल्पनेतून सदर काम मंजूर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बालाभाऊ सोनटक्के यांनी केले तर सूत्र संचालन ग्रामसेवक आर. जी. शेंदरे यांनी केले पंचायत समिती आर्वी अंतर्गत सर्व ग्राम पंचायत मधील ३९३ शासकीय इमारती मधील पाऊस पाणी संकलनाचे काम मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ स्मार्ट ग्राम मिर्झापुर(नेरी) येथून करण्यात आला, ३० जून २०२३ पर्यंत तालुक्यातील सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन विकास अधिकारी डॉ गणेश माने यांनी केले आहे. या कार्यक्रमा करिता उपसरपंच सिध्दार्थ काळपांडे ,ग्रा. प. सदस्य महेश कठाने पद्माताई मुंदरे,मनोरमाताई नेवारे, वैशाली सोनटक्के, जोतीताई बन्सोड शामराव वाळके यांचे सहकार्य लाभले,यावेळी सर्व महिला बचत गटांच्या सद्स्य, ग्राम उसत्व समिती चे सद्यस्य ,जेस्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वांचे आभार मानून अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


