दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): येथील हुतात्मा स्मारक समिती द्वारा संचालित हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वर्ग १२ वी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाने जाहीर केला त्यात हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व एमसीव्हीसी शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून कला शाखेचा ९६.२० टक्के उत्तीर्ण निकाल आहे यात महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत १६२ पैकी १६ प्राविण्य प्राप्त विद्यार्थी असून प्रथम श्रेणीत ५६ तर द्वितीय श्रेणीत ९० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर कला शाखेतील ८१ पैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण असून प्राविण्य प्राप्त विद्यार्थी शून्य संख्या असून प्रथम श्रेणीत ११ द्वितीय श्रेणी ४३ तर तृतीय श्रेणी २२ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत तर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के असून यात १३७ पैकी प्राविण्य प्राप्त ८ विद्यार्थी असून श्रेणी १ मध्ये ५६ विद्यार्थी असून श्रेणी २ मध्ये ७० विद्यार्थी असून उत्तीर्ण मध्ये ३ विद्यार्थी आहे तर कला शाखेतील निकाल ९१.८३ टक्के आहे यात १ विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त असून श्रेणी १ मध्ये ६ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणी मध्ये ३० तर तृतीय श्रेणीत ८ विद्यार्थी आहेत वाणिज्य शाखेमधील ६९ पैकी ६९ उत्तीर्ण आहे यात प्राविण्य प्राप्त ३ विद्यार्थी असून प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ४६ तर तृतीय श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत तर साहुरच्या ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचे निकाल ८०.३५ टक्के आहे यात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी संख्या शून्य असून प्रथम श्रेणीत २ विद्यार्थी असून द्वितीय श्रेणीत १९ तर तृतीय श्रेणी मध्ये २४ विद्यार्थी उत्तीर्ण आहेत तर आष्टीच्या जवाहर उर्दू कनिष्ठ महाविद्यालय येथील कला शाखेच्या निकाल ९५.८३ आहे यात २४ विद्यार्थ्यापैकी २ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त असून प्रथम श्रेणी उत्तीर्ण संख्या ५ तर तृतीय श्रेणी विद्यार्थी संख्या १६ आहे हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्तीर्ण टक्केवारीचे श्रेय प्राचार्य प्रा.राम बालपांडे यांच्या उत्तम नियोजनासह सहकारी उच्च माध्यमिक शिक्षकांना जाते


