दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भु म:-तालुक्यातील भवानवाडी येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज,संत बाळू मामा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साह पूर्ण भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.श्री.ह.भ.प हनुमंत मते महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी विकासरत्न संजय नाना गाढवे,संदीप नाईकवाडी एडवोकेट जाधवर, मधुकर अर्जुन, खंडू गोयकर, ईश्वर पाटील, लहू अर्जुन, रमेश अर्जुन ,राहुल भायगुडे, गोकुळ खताळ आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


