
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): नजीकच्या साहूर येथील बोरखेडी शिवारात शेत सर्व्हे न ४५ मध्ये अंदाजे अडीच वर्षीय मादी बिबट विद्युत रोहित्राचा (डीपी) धक्का लागून ठार झाल्याची घटना काल सकाळीच उघडकीस आली त्याच रोहित्राच्या वरच्या टोकावर (डीपी) एक माकड चढल्यामुळे मृत झाल्याची माहिती आहे या दोन्ही वन्यप्राण्याच्या मृताचा एकमेकांशी संबंध आहे काय? हे तपासल्या जात आहे काहींच्या मते माकडाच्या शिकारीच्या
नादात बिबट रोहित्रावर चढल्याने शॉक लागून मृत झाल्याचे म्हटल्या जाते संबंधित शेतकऱ्याला हा प्रकार दिसतात त्यांनी संपर्क साधून घटनेची माहिती संबंधितांना कळविली आणि बाकी प्रशासकीय सोपस्कार पार पडले यात बिबट्याच्या मृत्यूचे अंदाजे कारण आणि शवविच्छेदन अहवाल तयार करून अग्नी देण्यात आला आणि वरिष्ठ कार्यालयास मृत बिबट्याच्या बाबतीत कळविण्यात आले तेव्हा वर्धा सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गजानन बोबडे घटनास्थळावर हजर झाले आणि कारवाई करण्यात आली घटनेच्या बाबतीत अधिकृत माहिती करिता संबंधित वनरक्षक गोविंद सोन्नर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता सोन्नर यांनी माहिती
देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करताच प्रस्तुत प्रतिनिधीनी आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी योगानंद ऊइके यांचे नाव सांगताच मनात नसूनही सोन्नर यांनी कशीबशी माहिती सांगितली त्यामुळे वाचकांसाठी अपमान सहन माहिती संकलित करून वृत्तसेवा केली त्यामुळे अश्या कर्मचाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानउघाडणी करणे आवश्यक आहे एवढे मात्र नक्की आणि तर अपघातग्रस्त घटनास्थळी वन्यप्राणी संघटना प्रतिनिधी, वीज वितरण कंपनी,पशू आरोग्य विभाग व वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यासह आजूबाजूचे शेतकरी उपस्थित होते