
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भोकर -संदिप किशनराव किसवे पाटील
भोकर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून भोकर तालुक्यातील मौजे हळदा गावातील महिलांनी समाजकार्य करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून गावातील दारूबंदीचा निर्णय हाती घेऊन गावात विकणारी देशी व विदेशी दारू पूर्णतः बंद करावी अशी मागणी (सहायक पोलीस अधीक्षक)IPS शफकत आमना मॅडम पोलीस उपविभागीय कार्यालय उपविभाग भोकर यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली आहे
भोकर पोलीस उपविभागीय कार्यालय उपविभाग भोकर येथे कार्यरत असलेल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या UPSC 2018 बॅच 186 रँक घेऊन उत्तीर्ण झालेल्या आयपीएस मॅडम यांनी भोकर पोलीस उपविभागांमध्ये असणाऱ्या हिमायतनगर व भोकर शहरांमध्ये गुटखा व देशी विदेशी दारू सारखे अवैध धंदे चालवणाऱ्या दुकानावर छापेमारी करून अवैधधंदे विषयी नागरिकाकडून येणाऱ्या तक्रारीचे निराकरण केले आहे व मॅडम कडे तीच अपेक्षा ठेऊन हळदा गावातील महिलांनी हाळदा गावामध्ये मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून दारू बंद होती परंतु गेल्या दोन वर्षापासून दारू काही लोकांनी विकण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे गावामध्ये महिलांना त्रास होत असून संसार उध्वस्त होत आहेत ना बालक मुले दारूच्या आहारी जाऊन शाळा शिकण्यापासून वंचित राहत आहेत भांडणे, चोरी,जुगार, अपघात, व बिमारी मुळे मृत्यू चे प्रमाण वाढले आहे तरी महिला या त्रासाला वैतागून गेले आहेत एकीकडे गरिबीमुळे दररोज शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये काम करावे लागते त्यानंतर घरी आल्यानंतर पती व मुले यांचा त्रास त्यामुळे महिलांची समस्या कोणाकडे मांडावी हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण प्रशासनाला भोकर पोलीस स्टेशन येथे खूप वेळेस अर्ज देऊन काही ठोस कारवाई केल्या जात नसल्यामुळे या महिलांनी पोलीस उपविभागीय मॅडम यांच्यावर विश्वास ठेवून कार्यवाहीची मागणी केली आहे यामध्ये गावांमधील काही महिला, तंटामुक्ती अध्यक्ष, व काही तरुण कार्यकर्ते उपस्थित राहून ग्रामसभेचा ठराव व दारूबंदीचे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना दिले आहे