
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर घुग्गुस परिसरातील भालार वसाहत येथे वणी नार्थ विभागातील भारतीय कोयला खदान मजदुर संघ वणी-माजरी एरियाचे दहावे द्वैवार्षिक अधिवेशन दि.३० मे २०२३ रोजी
वणी-माजरी एरिया अध्यक्ष चंद्रप्रकाश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली, टिकेश्वर राठोड-अध्यक्ष अखिल भारतीय कोयला खदान मजदुर संघ प्रमुख टिकेश्वर राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत सुधीर घुरडे(महामंत्री),श्री विवेक अल्लेवार (उपाध्यक्ष), विदर्भ प्रदेश , कमलाकर पोटे (समन्वयक) वेकोली संघटन, आशिष मूर्ती सदस्य वेकोली समन्वय समिती, श्री देवेंद्र आडे जिल्हा मंत्री यवतमाळ, प्रमोद येलचलवार – जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, प्रवीण मुनगंटीवार जिल्हा मंत्री चंद्रपूर, पुजाताई मेंढुळे महिला प्रमुख व वणी-माजरी यांच्या उपस्थितीत प्रादेशिक, उपप्रादेशिक अधिकारी आदी मान्यवरांसह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संघटनात्मक माहिती टिकेश्वर राठोड यांनी तर श्री.सुधीर घुरडे यांनी JBCCI-11 बद्दल सविस्तर माहिती दिली. निवडणूक अधिकारी विवेक अल्लेवार उपाध्यक्ष, विदर्भ राज्य, भाकोखम संघ वणी-माजरी आणि भाकोखम संघ वणी-ताडाळी च्या दोन कार्य समित्यांची यावेळी स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये
भारतीय कोयला खदान मजदुर संघ वणी-माजरी अध्यक्ष चंद्रप्रकाश रहांगडाले अध्यक्ष व महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांना पुन्हा नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी – ताडाळी (पं. क्र.NGP5799) अध्यक्षपदी विजय माळवी तर महामंत्रीपदी अनंतकुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री. रहांगडाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन सर्वांचे आभार मानून अधिवेशेनाची सांगता केली. असे भारतीय कोयला खदान मजदुर संघ वणी-ताडाळी चे प्रसिद्धी मंत्री राजेंद्र पांचभाई यांनी कळविले आहे.