
योग शिक्षक धनराज गोलावर यांनी दिले योगाचे धडे
दैनिक चालु वार्ता
नवनाथ डिगोळे चाकुर शहर प्रतिनिधी
योगा हा जरी भारतात सुरू झाला असला तरी त्याचा विस्तार आता जगभरात झाला असून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जात आहे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन चाकूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांनी केले.
चाकूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती चाकूर , तहसील कार्यालय चाकूर , नगरपंचायत कार्यालय चाकूर व रोटरी क्लब चाकूर व भारतीय जनता पार्टी चाकूरच्या संयुक्त विद्यमाने आज दि.21जून रोजी विश्वशांती धाम मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी चाकूरचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार निलेश होनमोरे, नायब तहसीलदार डॉ. रोहन काळे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय नरळे, दीपाली निकेतन कदम,रोटरी क्लबचे अध्यक्ष नारायण बेजगमवार,अंगणवाडी पर्यवेक्षिका नागीणबाई गिरी, शोभा माने आदी मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे या योग शिबिरात सहाय्यक पोलीस अधिक्षक कदम हे सपत्नीक सहभागी झाले होते.
योग प्रशिक्षिकांनी सांगितलेल्या योगाच्या सर्वच गोष्टी आपल्याला जमतील असे नाही. परंतु किमान पाचतरी योग नियमितपणे प्रत्येक व्यक्तीने केले तर खऱ्या अर्थाने योग दिनाचे सार्थक झाले असे होईल.शरीरासाठी योगा करणे अधिक चांगले असून योगा केल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते असे सांगून कदम यांनी योग प्रशिक्षक धनंजय गोलावर यांचे कौतुक केले.तसेच पतंजली योग समितीच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार निलेश होनमोरे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनीही शुभेच्छा दिल्या.
योग प्रशिक्षक धनराज गोलावर यांनी योगा विषयी माहिती सांगत सांगत योगाचे विविध धडे उपस्थितांना दिले. या कार्यक्रमासाठी पतंजलीचे तालुका प्रभारी ओमप्रकाश लोया, किसान पंचायतचे तालुका प्रभारी गुणवंत जानकर, योग शिक्षिका सुमन पवार,सुरज सोनटक्के,अमोल येरवे,बाळू माने,शिवसांब गंगापुरे,सिद्धेश्वर पवार, यांनी पुढाकार घेतला.डॉ,अपर्णा मुचाटे, अरुण तपघाले,अश्विनी गोरे,योग शिक्षिका, स्वाती कदम,,चंद्रशेखर मुळे,तलाठी अविनाश पवार,पत्रकार मधुकर कांबळे,सतीश गाडेकर , प्रेमकिशन शेळके, अजय काळे,रविकिरण स्वामी,गणेश स्वामी,वसंत भोसले,रघुनाथ हांगे,राजिव डिगोळे,राजकुमार घोगरे यांच्यासह शहरातील अनेक योग प्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमच्या प्रारंभी मान्यवारांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून योगाची सुरुवात करण्यात आली. तसेच सर्व मान्यवारांचा पतंजली योग समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सूरज सोनटक्के यांनी केले.