
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुरुवारी सकाळी व्हाइट हाऊस दिव्य स्वागत झालं. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडून मोदींचा चांगला पाहुणचार सुरू आहे.
याचदरम्यान, नरेंद्र मोदी यांचा १९९४ सालचा व्हाईट हाऊस बाहेरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेला संबोधित करणाऱ्या नरेंद्र मोदींचं कौतुक होत आहे.
नरेंद्र मोदी हे ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी फक्त भाजपचे कार्यकर्ते होते. पंतप्रधान मोदी हे याआधी देखील अमेरिकेला गेले आहेत. मात्र, मोदी यांचा हा पहिला महत्वाचा राजकीय दौरा असल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हटले की, ‘पहिल्यांदा अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचे दरवाजे भारतीयांसाठी खुले झाले आहेत. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात लोकशाही आहे.
‘कोरोना काळानंतर झालेली भारत आणि अमेरिकेची मैत्री जगात महत्वाची ठरेल. माझं चांगलं स्वागत केलं, त्याबद्दल बायडेन यांचा आभारी आहे. भारताचा तिंरगा आणि अमेरिकेचा झेंडा उंच भरारी घेत आहे. ‘१४० कोटी जनतेच्या वतीने मी आभार मानतो, नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
=========बॉक्स
३० वर्षांपूर्वी मोदी अमेरिकेला का गेले होते?
नरेंद्र मोदी १९९४ साली अमेरिकेला गेले होते. मोदी यांना अमेरिका काउंसिल ऑफ यंग पॉलिटिकल लीडर्स आमंत्रित केलं होतं. त्यांच्यासोबत अन्य काही नेते भारतातून अमेरिकेला गेले होते. त्यांच्यासोबत भाजपते वरिष्ठ नेते किशन रेड्डी देखील उपस्थित होते.
किशन रेड्डी सध्या पर्यटन मंत्री आहेत. रेड्डी यांनी २०१४ साली मोदी यांचा व्हाईट हाऊस बाहेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी फेसबुकवर शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, १९९४ साली मोदी यांना ACYPL या संस्थेने आमंत्रण दिलं होतं.
==============बॉक्स