
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील कै. शिवाजी परसराम दरेकर यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त दै. बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी गावात प्रत्येक घरोघरी झाडांची रोपे देऊन ‘एक व्यक्ती , एक वृक्ष’ लागवड व संवर्धनाचा संकल्पाचे दुसऱ्या वर्षीही आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविला. विषेश म्हणजे , प्रथम पुण्यतिथीनिमित्त लावगड केलेल्या झाडांची झालेली वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. वडिलांच्या हयातीत देखील रामेश्वर शिवाजी दरेकर हे वृक्षारोपण दरवर्षी नित्य नियमाने करत होते वडिलांच्या निधनानंतर देखील यात खंड पडू दिला नाही अनेक जातीचे वटवृक्ष उंच उंच वाढली आहे. झाडाबाबतीत असलेले प्रेम हे गावकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरसोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून प्रत्येकांनी जर वृक्षरोपण करण्याबरोबरच वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो, असे मत दै. बुलंद शक्ती संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी व्यक्त केले.
कै. शिवाजी दरेकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि विचार रामेश्वर दरेकर जपत असून व्दितीय पुण्यतिथी निमीत्ताने लिंबूनी, कढीपत्ता, सिताफळ, मोगरा, पेरु ,वड पिंपळ इत्यादी वटवृक्षाची झाडे वझर सरकटे येथे वाटप करण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर वडिलांची आठवण वटवृक्षाचे संगोपन करुन पर्यावरण समतोल अबाधित ठेवून जपावी पशुपक्षी देखील वटवृक्ष असतील तर यांची लोकसंख्या वाढु शकते अन्यथा पक्षुपक्षी देखील कालबाह्य होतील. उन्हापासुन सुरक्षा झाडापासून मिळते ,पाऊस देखील झाडामुळे पडतो, शुद्ध हवा आपल्याला या झाडामुळे मिळते शुध्द हवेचे महत्त्व कोरोनात निधन झालेल्या लोकांना माहित आहे यामुळे जगण्यासाठी हवा अत्यंत उपयुक्त आहे या साठी वटवृक्ष जगवणे यांची निगा राखणे हे गरजेचे आहे असे मत रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी वयक्त केले. यावेळी
आदींसह अनेकांची उपस्थिती होती.