
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इंदापूर तालुका,रिगल प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त जि.प.प्राथमिक शाळा भोंगवाडी, निमगाव केतकी या शाळेत ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे (वही,पेन,पेन्सिल, खोडरबर,पाटी) वाटप करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष,ॲड.सुधीर पाटसकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इंदापूर तालुका आणि रिगल प्रतिष्ठान यांच्या वतीने गेली ६ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.
यावेळी इंदापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राजु भोंग, शाळेचे मुख्याध्यापक कुचेकर सर, शिक्षक संतोष भोंग सर, रवि दुधाळ, शिवा भोंग, अंबादास जगताप, गौरव भोंग, सौरभ डोंगरे उपस्थित होते.