
यंदा शालेय साहित्याच्या किमतीमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:यंदा शालेय साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याने है साहित्य खरेदी करताना विद्यार्थी आणि पालकांची दमछाक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळत असली तरी वह्यांसाठी पालकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
दोन महिन्याच्या सुट्टीनंतर १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने पालकांनी शनिवारी, रविवारी सुट्टीची संधी साधत बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सर्व प्रकारच्या साहित्यांच्या दरात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ झाल्याने यंदा पालकांच्या खिशाला झळ बसणार असल्याचे दिसते. शाळा सुरू होण्यास आठवडा राहिल्याने नगर शहरातील बाजारपेठेत शालेय साहित्यासाठी पालकांची गर्दी होती. शनिवार व रविवार सुट्टीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडले होते.
वह्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले.
बाजारात वह्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून, कागदाच्या प्रतीनुसार त्याच्या किमती ठरल्या जातात. अगदी ४०० रुपयांपासून ८०० रुपये डझनपर्यंत वह्यांच्या किमती आहेत. १०० पानांची वही २५ रुपये, २०० पानांच्या वहीची किमत ३५ रुपये आहे. यंदा पाच ते सात रुपये प्रति वहीमागे वाढले आहेत. १०० पानांची (लॉग बुक) ४० रुपये तर २०० पानांची ८० रुपयांना मिळत आहे. प्रत्येक लॉंग बुकमागे १० ते १५ रुपये यंदा वाढले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. या दरम्यान
यावर्षी पुस्तकामध्ये वह्यांची पाने दिली जाणार असली तरी मुलांना अतिरिक्त वह्या खरेदी कराव्या लागणार आहेत. तसेच नववी, दहावीची पुस्तके, वह्या, बॅग, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कोरोना काळानंतर कच्चा मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दराचा आर्थिक फटका विक्रेत्यांबरोबर पालकांना बसला आहे.
नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच
उपलब्ध आहे. नववीचा संच हा गतवर्षी ४१९ रुपयांना मिळायचा. यात ८ पुस्तके असतात. तो आता ५२३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
दहावीच्या पुस्तकांचा संच हा ५७५ रुपयांवरून ६६५ रुपये इतका झाला.
त्यात ९ पुस्तके असतात. अशा या महागाईमुळे अक्षरशा पालकांचा आर्थिक बजट कोडमडल्यासारखं दिसून येत आहे.