
दैनिक चालु वर्ता
बीड अंबाजोगाई प्रतिनिधी
आंबाजोगाई परिसरातील येल्डा हे गाव अतिशय खडतर घाटातून रहदारी करावी लागते त्यातच ते जंगल परिसर येत असल्यामुळे जंगली प्राण्यांचे पण तेथे रात्री अपरात्री भीती असते अशातच घाटातला रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते त्यामुळे राज्य परिवहन मंडळ अंबाजोगाई आगाराने या कारणास्तव बस बंद केली होती, त्यामुळे शालेय विद्यार्थी व्यावसायिक, गावकरी व इतर नागरिकांना या गैरसोयीचा फार त्रास सहन करावा लागत होता पण आता येथील अरुंद रस्ता हा रुंदीकरण करून सुस्थितीत केल्यामुळे लवकरच बस सेवा चालू होईल असा विश्वास अंबाजोगाईतील ज्येष्ठ नेते श्री नंदकिशोर जी मुंदडा यांनी बोलून दाखवला.