
केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या जन-सामान्यांपर्यंत गेल्या पाहिजेत – गोपाल चंदन (विधानसभा प्रमुख)
दै.चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.यानिमीत्तानं सरकारच्या या नऊ वर्षांच्या वाटचालीतल्या महत्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “जनसंपर्क से जन समर्थन तक” या कार्यक्रमाचे अंजनगाव सुर्जी येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे शनिवार रोजी अंजनगाव सुर्जी येथे भाजप द्वारा घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा अंजनगाव सुर्जी-दर्यापूर मतदार संघ विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी भाजपच्या कामांची यादी वाचून दाखवत भाजप जनसामान्यांसाठी कसे काम करत आहे याची माहिती त्यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे “जनसंपर्क से जन समर्थन तक” या कार्यक्रमात दिली.
तसेच गोपाल चंदन यांनी यावेळी सांगितले की,नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात ५४ योजना घोषित केल्या आहेत आणि त्याचा लाभ देशातील कोट्यवधी लोकांना मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत गेल्या पाहिजेत,तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जाणीव प्रत्येक नागरिकाला करून द्यावी म्हणून प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहेत असेही गोपाल चंदन यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाळ “जनसंपर्क से जन समर्थन तक” हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशान्वये खासदार अनिल भोंडे,जिल्हाध्यक्ष निवेदिताताई दिघडे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवर मा.आ.प्रकाश भारसाकळे,माजी नगराध्यक्ष ऍड.कमलकांत लाडोळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनिष मेन,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास कविटकर,जिल्हा सचिव ऍड.पद्माकर सांगोळे,ओबीसी महीला जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई मालठाने,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दाळू,विक्रम पाठक,संदीप राठी,दर्शन जोहरापुरकर,मनोहर मुरकुटे,शहर मंडळ सचिव राजेंद्र रेखाते,विजय काळमेघ,नितीन पटेल,गजानन काळमेघ,नंदकिशोर काळे,संतोष काळे आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते…
मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचालं तर आपली उन्नती होईल.
– आ.प्रकाश भारसाकळे भाजपा