
कोरड्या पाण्याचं राजकारण करणाऱ्या त्रिकुट आघाडीच्या सरकारला जनतेने घरचा रस्ता दाखवला माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांचा विरोधकांवर घणाघात
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
भूम:-भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ पंधरा वर्षे मागे विरोधकांमुळे गेला होता,परंतु राज्यात व देशात भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून हा मतदारसंघ तेवढ्याच गतीने विकासाच्या दिशेने पुढे गेला आहे.कोरड्या पाण्याचं राजकारण करणाऱ्या त्रिकुट आघाडीच्या सरकारला जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे,आगामी काळात देखील देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्रच्या माध्यमातून पुन्हा भाजपचे सरकार येईल असा विश्वास माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांनी पक्ष महासंमेलना प्रसंगी बोलताना व्यक्त केला.दि.25 जून 23 रोजी यश मंगल कार्यालयामध्ये भूम-परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चा, महिला आघाडी, दिव्यांग आघाडी,शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, भाजपाचे सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, संस्था चेअरमन, उप चेअरमन आणि पदाधिकाऱ्यांचे एक दिवसाचे महासंमेलन संपन्न झाले.या महासंमेलनासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या बरोबरच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष विधिज्ञ मिलिंद पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, वाशी तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, वाशी नगरपंचायत उपनगराध्यक्ष सुरेश कवडे , पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष लोहकरे तात्या, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी आदीची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघासाठी मराठवाडयाच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी किती तपश्चर्या करावी लागली, मागच्या सरकारने किती कोरड्या पाण्याच राजकारण केले याचा वाडा वाचला. आता हे पाणी मिळवण्याचा मार्ग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या परिपूर्ण योगदानामुळे मार्गी लागले आहे, भविष्यकाळात या मतदारसंघात सुजलाम सुफलाम असे वातावरण निर्माण होणार आसल्याचा विश्वास दिला.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 9 वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात घेतलेल्या जनकल्याणकारी योजनेची जाणीव जागृती घरा घरापर्यंत करावी अशा प्रकारच आव्हाहन यावेळी विधिज्ञ मिलिंद पाटील यांनी केले.या महासंमेलनाच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक दमयंती विकास जालन,अंगद मुरूमकर, रोहन जाधव, चंद्रकांत बोराडे तसेच संजय गांधी निराधार योजना समिती वाशी तालुक्यातून सदस्य म्हणून सहभागी झालेले सुधीर घोलप, भूम तालुक्यातील सदस्य म्हणून महादेव वडेकर , संतोष सुपेकर व सुदाम पाटील यांची निवड झाली त्यांचाही सन्मान केला, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या योगदानातून ज्यांना छोट्या-मोठे अर्थसहाय्य मिळाले आहे अशां सौ मनीषा क्षीरसागर, ज्योती बोराडे , रमेश आरगडे यांचा तर कोरोना काळात कोरोना लस मिळालेले लाभधारक बालाजी बगाडे यांचाही लाभधारक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव केला.भारतीय जनता पार्टीचे महासंमेलनसाठी या मतदार संघातील भाजपा महिला मोर्चा, अल्पसंख्यांक आघाडी, उद्योग आघाडी, दिव्यांग आघाडी, भाजपाचे सर्व सरपंच , उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, भाजपाचे शक्ति केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख , विविध आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या महासंमेलना दरम्यान दयानंद बोराडे या कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चामध्ये प्रवेश केला.या महासंमेलनाच्या यशस्वीतेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष अमोल बोराडे , बाबा वीर, शहराध्यक्ष शंकर खामकर सरचिटणीस हेमंत देशमुख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महेबूब शेख, शहराध्यक्ष प्रदीप साठे, चंद्रकांत गवळी, विधीज्ञ संजय शाळू, श्रीपाद देशमुख, संदिप महानवर , शांतिलाल बोराडे, सुहास बोराडे, सुहास बुरटे यानी प्रयत्न केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे शहराध्यक्ष शंकर खामकर यांनी केले तर आभार रोहन जाधव यांनी मांडले…