
दै.चालु वार्ता
प्रतिनिधि उमरगा/तुळजापूर
शिवराज पाटील
धाराशिव:-सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी मोठी तपश्चर्या लागते ती सहज वाटणारी गोष्ट नाही,असे उदगार समाज विकास संस्थेच्या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी सत्कारानंतर धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काडले.तर धाराशिव-कळंब चे आमदार कैलास दादा पाटील यांनी सामाजिक कार्य करत असताना शासकीय पातळीवरील काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर आमच्या कानावरती नक्की घाला. सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत असू असे आश्वासन दिले. त्यासोबत गायरान प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मी आलो होतो. गायरान प्रश्न तारांकित केला होता. याची त्यांनी आठवण करून दिली. भविष्य काळामध्ये गायरान प्रश्न नक्की मार्गी लावू असेही आश्वासन दिले.समाज विकास संस्था कार्यालय सदिच्छा भेटीमध्ये भूमिपुत्र वाघ आणि निखिल वाघ यांनी समाज विकास संस्थेनी केलेल्या कार्याचा आढावा खासदार आमदार यांच्या सोबत मांडला. यामधे दुष्काळामध्ये होरपळलेल्या शेतकरी, प्राणी पक्षी यांना केलेली मदत. कोविड19 केलेले कार्य,मागासवर्गीय मुलांचे प्रश्न, अनाथ मुलं, महिलांचा सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक बदल, जमिन आणि गायरान प्रश्न त्यातील सरकारी अडचणी या विषयावरती सविस्तर चर्चा केली. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांचा समाज विकास संस्थेचे सचिव भूमिपुत्र वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत साहित्यामध्ये भूमिपुत्र वाघ यांनी प्रकाशित केलेली वाटसरू, संवेदना, मृदगंध इत्यादी काव्यसंग्रहाची पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी समाज विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निखिल वाघ,सोबत उमेश आबाचने,मैलारी शिरोळे ,संकेत लवटे ,सोम आंटद ,कृष्णा पाटील,विद्या मारकड, आदी कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.