
११५ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ…
विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी शिबिराला दिली भेट…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्याची सामाजिक बांधिलकी म्हणून केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गेल्या पाहिजे करिता भारतीय जनता पार्टी व माजी आमदार स्व.किसनराव खंडारे बहुउद्देशिय संस्था दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य उपचार शिबिर अंजनगाव सुर्जी नगरीतील संत रूपलाल महाराज कॉम्प्लेक्स पान अटाई येथे संपन्न झाला.
यावेळी विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याकरिता आलेल्या रुग्णांची विचारपूस केली व त्यांची गैरसोय न व्हावी करिता कार्यकर्त्यांना तश्या सूचना केल्या.तसेच ऍड.भूषण खंडारे व विशेष योगदान दिलेल्या डॉ.मिलिंद पाठक,डॉ.आशिष डगवार,डॉ.महेंद्र सांगोळे,डॉ.सुनील साकरकर,डॉ.भूपेंद्र लोखंडे या सुप्रसिध्द तज्ञांचे व चमूचे त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी भव्य आरोग्य उपचार शिबिरादरम्यान ११५ रुग्णांनी लाभ घेतला तर या शिबिरावेळी उपस्थित गणमान्य भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास कविटकर,जिल्हा सचिव ऍड.पद्माकर सांगोळे,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष मनिष मेन,ओबीसी महीला जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई मालठाणे,माजी आरोग्य सभापती सुनीताताई मुरकुटे (न.प.अंजनगाव सुर्जी),माजी उपाध्यक्ष सविताताई बोबडे (न.प.अंजनगाव सुर्जी),माजी सदस्य शिलाताई सगने (न.प.अंजनगाव सुर्जी),संगीता ताई मेन,निताताई मोगरे,संजय नाठे,अविनाश पवार,गजानन काळमेघ,हर्षल पायघन,रितेश आवंडकर,गौरव चांदुरकर,सतीश मट्टे आदी भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते.