अवधूत शेंद्रे
दै. चालू वार्ता उपसंपादक आष्टी
आष्टी(श)(वर्धा) : लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात वर्ध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यातील वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रम सोहळ्यातील कौतुकापेक्षा गचाळ नियोजनचीच चर्चा बाहेर आली यात असे की, प्रशस्तीपत्र कार्यक्रमास बोलावलेल्या विद्यार्थ्यांना टक्केवारीची अट व्यवस्थित नसल्यामुळे आल्या पावली परतावे लागले त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा प्रचंड हिरमोड झाला तर प्रशस्तीपत्रावर नीटपणे एसएससी किंवा
एचएससी असे अधोरेखित केलेले नाही शिवाय सन्मान चिन्हावर व्यवस्थितपणे गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव नाही आणि सोबतच प्रशस्तीपत्र वाटप करताना प्रचंड घाईत विद्यार्थ्यांची नावे घेण्यात आली त्यामुळे प्रशस्तीपत्र स्वीकारणारे विद्यार्थी ऐन वेळेवर गोंधळात पडले सोबत आलेल्या पालकांना सत्कार मंचावर बोलवण्याची तसदी नियोजन कर्त्या विभागाने घेतली नाही त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे त्या कारणे छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचा गोडवा निघून गेल्याची चर्चा आता रंगू लागली आहे
प्रतिक्रिया
कार्यक्रमात एखादी चूक होऊ शकते असे म्हणून वर्धा सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी फोन बंद करून प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली
प्रतिक्रिया
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) प्रसाद कुलकर्णी हे पूर्णपने न्याय देवू शकत नाही
सुरेश काळबांडे
सामाजिक कार्यकर्ता तथा
माजी नगरसेवक आष्टी(श)