
एमडी पदवी भेटल्या बद्दल गौरव करण्यात आला..
दै.चालु वार्ता प्रतिनिधी
धनंजय गोफणे परंडा
परंडा-परंडा शहरातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा या विद्यालयाची विद्यार्थीनी कु. आयेशा अब्दुलकलीम हन्नुरे या विद्यार्थीने एम.बी.बी.एस.पुर्ण केले , व नीट पी.जी.२०२३ऑल इंडिया रॅंक मध्ये ६७८६ नंबर आणि एम.डी. पात्र ठरल्याबद्दल कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते ,शाल,पुष्पहार, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर पदवीचे शिक्षण पूर्ण करणारी कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडयाची विद्यार्थीनी तसेच मा.आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या कन्या कु सुयशा सुजितसिंह ठाकूर याचा ही कल्याणसागर समूहाचे संचालक श्री. विकास कुलकर्णी यांच्या हस्ते गुणगौरव सत्कार करण्यात आला या दोन्ही विद्यार्थिंनींच्या पालकांचा हि पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्रीमती सौ शैलाताई ठाकुर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत आभार कल्याणसागर माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक श्री किरण गरड सर यांनी मांडले तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते…