
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
अंबाजोगाई बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई जि.बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे नेते बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब , राजपाल साहेब लोमटे, राजकिशोरजी मोदी, ताराचंद शिंदे, बंडूभाऊ गित्ते,श्री गणेश भैय्या देशमुख आदी उपस्थित होते.
या निवडी बद्दल श्री तानाजी नानासाहेब देशमुख यांनी सर्व गोरगरीब, शेतकरी बांधव व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखीन तळागाळात बळकट करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करत आहे ,केले आहेत व आता तर या नियुक्तीमुळे मला आणखीन हत्तीचं बळ मिळाले माझ्यावर जो विश्वास वरिष्ठांनी दाखवला आहे तो नक्कीच मी सार्थ करून दाखवेल असं मनोगत श्री तानाजी भैया देशमुख यांनी दैनिक चालू वार्ता शी बोलताना व्यक्त केल.
श्री तानाजी देशमुख यांच्या निवडी बद्दल सर्व अंबाजोगाईतील पंचक्रोशीतील तालुक्यातील युवा , ज्येष्ठ हे आनंद व्यक्त करत आहेत.