
दै.चालू वार्ता,वैजापूर प्रतिनिधी
भारत पा.सोनवणे
वैजापूर– शहरातील खान गल्ली भागात विविध ठिकाणी छापे टाकुन ही कारवाई वैजापूर उपविभागाच्या सहाय पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकाने या कारवाईत जवळपास दोन क्विंटल जनावरांचे विक्रीसाठी ठेवलेले मांस, ५८ जनावरे असा सोळा लाख ३५ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईतील ५८ निष्पाप जनावरांना वैद्यकिय तपासणी करुन तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील रेणुका माता गोशाळेत सुरक्षितरित्या हलवले आहे. वैजापूर शहरातील खान गल्ली भागात बेकायदा कत्तलखाने चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निशा बनसोड, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, गोलवाल, मोटे, पैठणकर यांच्या पथकाने खान गल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपींनी निर्दयीपणे जनावरांना डांबुन त्यांची कत्तल करत असल्याचे आढळुन आले. त्या 13 आरोपी विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे हे करीत आहेत….