
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव:-सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा. प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी महान कार्य करणारे महाराजांची 149 जयंती विविध शासकीय कार्यालय कॉलेज, हायस्कूल,शाळा मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भूम शहरातील रवींद्र हायस्कूल मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले दरम्यान उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज यांचे समाजातील योगदान व सध्या राजकीय स्थिती महाराजांचे विचार गरज शाहू महाराजांचे जीवन कार्य जातीभेद विरुद्ध लढा स्वतंत्र लढ्यातील योगदान व इतर कार्य वर प्रकाश टाकला.विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता महाराजांचे हे महान कार्य आहे. यावेळी उपस्थित रवींद्र हायस्कूल मुख्याध्यापक धनंजय पवार उप मुख्याध्यापिका शर्मिला पाटील श्री देशमुख समाजसेवक विठ्ठल बाराते अक्षय गाढवे उपस्थित होते.