
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव:- भुम येथील गालिब नगर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय युवक फैय्याज पठाण याने बुधवारी (दि. २१) पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मिडीयावर एक व्हीडीओ पोस्ट करून त्यात आरोपींनी केलेली मारहाण,छळ कंटाळून जीवन संपवत आहे असे सांगितले. भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु गून्हा दाखल होऊनही आरोपींना अटक झाली नाही.पोलीस प्रशासनाने दोन दिवसात आरोपींना अटक करतो असे आश्वासन दिले होते.परंतु पाच दिवस होऊनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यामुळे मुस्लिम समाजात रोष निर्माण झाला होता.या सर्व घटनेच्या निषेधार्थ दी.26 जून 23 रोजी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला व त्याने गांधी चौक ते गोलाई चौक असा मोर्चा काढून गोलाई चौकात जवळपास एक तास रस्ता रोखून धरला.यावेळी आरोपींना अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.प्रमुख मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत देण्यात आलेले आहे.या रस्ता रोकोमुळे तिन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.यावेळी तपास अधिकारी पो.नि.मंगेश साळवे म्हणाले की,पोलीस प्रशासन रात्र -दिवस काम करत आहोत प्रशासनावर विश्वास ठेवा.पोलीस प्रशासनाला सहकार्य करा.गुन्ह्यात असलेल्या सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करणार,ते आमचे कायदेशीर कर्तव्य आहे.असे पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर रस्ता रोको थांबवण्यात आला.भूम शहरातील मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रस्ता रोको केला. विशेष बाब म्हणजे या रस्ता रोको मुस्लिम समाजातील सर्व पक्षातील पदाधिकारी, व्यापारी, युवक सहभागी झाला होता.या रस्ता रोकोसाठी मुस्लिम एकता चे अध्यक्ष आसिफ जमादार, एडवोकेट सिराज मोगल, अख्तर जमादार, तोफिक कुरेशी, मामू जमादार, बबलू बागवान, फिरोज शेख, गौस शेख, शाकीर शब्बीर साप वाले, एजाज काझी, अन्नू कुरेशी, सरफराज कुरेशी, फारुख मोगल, रईस कुरेशी, समीर मोगल, कर्जत काझी, आफताब शेख, कलीम मोगल, असलम बागवान, सोहेल मोगल, शहाबाद पठाण, तनवीर मोगल, हबीब फकीर, समीर काजी, इम्रान पठाण, जमील पठाण, इरफान शेख यांनी परिश्रम घेतले, या रस्ता रोको साठी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.