दैनिक चालू वार्ता
माळाकोळी प्रतिनिधी तानाजी मारकवाड
शासन आपल्या दारी या मोहीमेअंर्तगत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मूख्यमंञी मा.एकनाथ शिंदे साहेब व ग्रामीणविकास मंञी मा. गिरीषजी महाजन यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक बीएड पदविधर शिक्षकमंच-शाखा नांदेड यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. आपल्या चळवळीचे संस्थापक राज्याध्यक्ष आकाराम ओंबासे यांच्या मार्गदर्शनानुसार सदर निवेदन देण्यासाठी सन्माननीय जिल्हाध्यक्ष .विश्वेश्वर वडिले,सरचिटणीस .सूभाषजी पानपट्टे , कार्याध्यक्ष सुधाकर थडके, कोषाध्यक्ष संजय हंकारे, महिला आघाडी अध्यक्षा सौ आशा शेटे, जिल्हानेते .व्यंकट गंदपवाड, .सुभाष चव्हाण,महिला आघाडी सरचिटणीस सौ.अनिता दाणे, कार्याध्यक्षा सौ.महानंदा पवळे(कदम),कोषाध्यक्षा सौ.शांता एंगडे आदि मान्यवरासह प्रत्यक्ष भेट घेऊन मूख्यमंञी महोदय व ग्रामविकास मंञी महोदय यांना आपल्या संघटनेच्या वतीने कार्यरत बीएड पदवीधर प्राथमिक शिक्षक व सेवा कालावधीत होत असलेला पदोन्नती व स्पर्धा परीक्षा या अनुषंगाने होत असलेला अन्याय आणि त्यास अनुसरून केलेली न्यायात्मक मागणी तसेच सदर निवेदन मान्यवर मंत्रीमहोदयांना देण्यात आले.
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंञी महोदय यांनी स्वतः निवेदन वाचन करून भावना समजून घेतल्या.