
डॉ.मधुकर गायकवाड अष्टगंध “जीवन गौरव पुरस्कार ” ने सन्मानित…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:, 24 जून 2023
वैद्यकीय क्षेत्रातील अनमोल कार्याची व यशस्वी व्यक्तिमत्वाची दखल घेऊन या वर्षीचा अष्टगंध च्या 38 व्या वर्धापनदिन निमित्ताने जे जे रुग्णालयाचे डॉ.मधुकर गायकवाड यांना
जीवन गौरव पुरस्कार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे उपसचिव श्री.नितीन दळवी व माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ श्री. बिपीन जगताप आणि संमारंभाध्यक्ष श्री. संतोष परब यांच्या हस्ते सुरेंद्र गावस्कर सभागृह , मराठी ग्रंथसंग्रलाय इमारत, दादर (पूर्व) ,मुंबई येथे दिनांक 24 जून 2023 रोजी देऊन सन्मानित करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व संपादक श्री लक्ष्मण कोकाटे व प्रकाशिका सौ उर्मिला कोकाटे यांनी दिपप्रज्वला नंतर सगळ्या मान्यवरांचे स्वागत करून समाजसेवा, पत्रकारिता,क्रीडा,उद्योग,शैक्षणिक,
विवीध सामाजिक संस्था यांना शाल, प्रशिस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शेवटीला आयोजकांनी सगळ्यांचे आभार मानून कार्यकर्माची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली….