
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती(अंजनगाव सुर्जी) : स्थानिक माळीपूरा सुर्जी येथील रहिवाशी व गोरेगाव जिल्ह्यात् हिंगोली येथे जि.प.हायस्कुल येथे शिक्षीका पदावर कार्यरत असलेल्या प्रिती एच.अंबाडकर (ठाकरे) यांना शिक्षणशास्त्र विषयात डॉ.एस.टी. कोटवाणी पदव्युत्तर विभाग प्रमुख सा.फु.शि.महाविद्यालय अकोट यांच्या मार्गदर्शनात पी.एच.डी. प्राप्त झाली .
संत गाडगेबाबा विद्यापिठाचा ३९ वा दिक्षांत समारंभ नुकताच पार पडला.त्यामध्ये डॉक्टरेट ही पदवी सौ.प्रिती एच.अंबाडकर ( ठाकरे ) यांना देण्यात आली असुन त्यांच्या संशोधनाचा विषय उच्च माध्यमिक स्तरावरील विदयार्थ्यांच्या कौटुंबिक वातावरण,ताणाचा शैक्षणिक संपादनाशी सहसंबंधात्मक अभ्यास असा होता.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ.एस.टी. कोटवाणी तसेच पदव्युत्तर विभाग प्रमुख सं.गा.बा.अ.विद्यापीठ डॉ.जी.एल.गुल्हाने सर,आई-वडिल,पती श्रीकांत ठाकरे व कन्या अनुश्री ठाकरे तसेच मामा अ.आर.यावले व सर्व कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभल्या मुळे यांचे आभार व्यक्त केले.प्रिती ठाकरे यांनी पी.एच.डी. पदवी पाप्त केल्याबद्दल गजानन चांदूरकर पत्रकार,प्रफुल विश्वंभर ठाकरे.अमोल ठाकरे,निलेश बोबडे,अनुप अंबाळकर,देवानंद टाक,यांनी कौतुक केले.