
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी..
वन्नाळी येथील सरपंच दोसलवार हे खिशात 50000 चे बंडल घेऊन गावाकडे जात असताना नकळत खिशातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वन्नाळी समोरील मुख्य रस्त्यावर हे पन्नास हजाराचे बंडल अलगतपणे पडले.काही वेळांनी श्री शिवशंकर विद्यालय वनाळीची विद्यार्थिनी आरती कहाळेकर या विद्यार्थिनी हे बंडल पाहिले आणि मनामध्ये कसल्याही प्रकारची लालसा न बाळगता ते कोणाचे आहेत की हे समजून तशीच पुढे गेली. त्यानंतर काही वेळातच तिच्याच मागे गरिबीने त्रस्त पण इमानदार असणारे शेख खाजामिया नबीसाब हे येत असताना त्यांच्यासमोर हे पन्नास हजाराचे बंडल पडलेले दिसले.अचानक लक्ष्मीचे दर्शन होतात कोणाच्याही मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होणे साहजिकच होते,पण शेख खाजा नबीसाब यांनी आपल्या इमानदारीचे दर्शन घडवत ही रक्कम उचलून त्यांनी कोणाची आहे हे चौकशी केली काही क्षणातच त्यांना कळाले की सरपंच दोसलवार यांची ही रक्कम आहे.हे कळताच त्यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली.अठराविश्व दारिद्र्य घरात असताना मोलमजुरी करून आपले जीवन जगत असताना माणसाच्या मनामध्ये अजूनही इमानदारी जिवंत आहे.हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध करत बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या आषाढी आणि बकरीईदच्या ह्या शुभ मुहूर्तावर खाजा नबीसाहब यांच्या या कृतितुन इमानदारीचे कौतुक मात्र सर्व परिसरात होत आहे. अजूनही या जगामध्ये इमानदारी शिल्लक आहे हे दाखवून देणारी ही घटना निश्चितच सर्वांना प्रेरणा देऊन जाणारी आहे हे मात्र नक्की त्यांच्या या इमानदारीचे कौतुक परिसरातुन सर्वत्र होत आहे…