
दैनिक चालू वार्ता
निलंगा तालुका प्रतिनिधी
इस्माईल महेबूब शेख.
दिनांक: 28 रोजी श्री महादेव माध्य. व उच्च माध्य विध्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ एस एस एम प्रतिष्ठाण चे कार्याध्यक्ष मा. श्री डी. बी. लोहारे गुरुजी यांच्या अधेक्षतेखाली आयोजीत करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेतून शिकून गेलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यात संजय बिराजदार ( तहसीलदार), दयानंद तुगावे ( अधिकारी केंद्रीय गुप्तचर विभाग भारत सरकार ) सौ मिनाताई परीट ( सरपंच ग्रा.प.का.धनेगाव)श्री रवींद्रकुमार पाटील (उपसरपंच धनेगाव) श्री गंपले व्ही. व्ही. ( मुख्याध्यापक यशवंत विध्यालाय अहमदपूर) ऑ ब्रह्मानंद धानुरे , तानाजी पाटील, प्रशांत पाटील, सतीश बिरादार, संजय दोरावे, शिवाजी आष्टुरे, सोनू डगवाले, सुशील पांचाळ, नवनाथ सोनाळे, संतोष डोंगरे, गणेश पुंडे अशा शाळेचे नाव लौकिक केलेल्या विध्यर्थांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर, 10 वि आणि 12 वित चांगले यश मिळविलेल्या विद्यार्थ्या चा ही सत्कार करण्यात आला. यात श्री लोहारे गुरुजी, उद्धवजी भोसले सर, आणि गुणवंत विध्यर्थी यांनी आपले मनोगत वेक्त करत शाळेचे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आला .या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे कुलगुरू मा श्री डॉ उद्धवजी भोसले सर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सौ सुनीताताई चवळे, श्री अनिलजी मूळे, तसेच रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवीदासराव कुटवाड गुरुजी उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील विधार्थी आणि गावातील प्रतिष्टीत वेक्ती उपस्थित श्री कुमार पाटील, आणि गावकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.